प्रेस नोट

महांकाळवाडगाव येथे 'सीसीआय'ची कापूस खरेदी सुरू; अत्याधुनिक यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • CCI cotton procurement begins at Mahankalwadgaon; Big relief to farmers due to sophisticated system

अहमदनगर जिल्ह्यातील महांकाळवाडगाव येथील प्रगतशील उद्योजक चांगदेव पवार यांच्या व श्रीरामपूर मार्केट कमिटी यांच्या अथक प्रयत्नाने भारतीय कपास निगमने म्हणजेच सीसीआय ने कापुस खरेदी सुरू केली आहे. अत्यंत अत्याधुनिक पध्दतीने श्री संत गंगागिरी अॅगरो इंडस्ट्रीज च्या आवारात ही खरेदी अत्यंत नियमबद्ध पध्दतीने सुरू आहे. सॅटेलाईट व ऑनलाईन पध्दतीने सीसीआय च्या ग्रेड नियमावली नुसार ही खरेदी सुरू असुन उच्च दर्जाचा कापुस येथे खरेदी केला जात आहे. सदर कापुस खरेदी केंद्रांस आमच्या टीम ने भेट दिली असता. अत्याधुनिक पध्दतीने ही खरेदी म्हणजे शेतकर्यांना उत्तम भाव उत्तम संधी असल्याचे निदर्शनास आले. संत गंगागिरी अॅगरो इंडस्ट्रीज चे चांगदेव पवार यांच्या उत्तम व्यवस्थापनाचा व अत्याधुनिक जिनींग मिल मुळे हे तालुक्याला मिळालेले केंद्र म्हणजे उत्तर नगर जिल्ह्य़ातील शेतकर्यांची साठी मिळालेली उत्तम संधीच म्हणावी लागेल.

सीसीआय च्या या खरेदी केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचा भावा बददलचा वजना बद्दलचा घोटाळा अशक्य असल्याचे दिसून आले. या वर्षी अति वृष्टी मुळे कापुस गुणवत्ता खालावल्याने कमी कापूस खरेदी होतांना दिसत आहे.

लोकनेते अजितदादा पवार यांना श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आदरांजली

  • Shrirampur Agricultural Produce Market Committee pays tribute to Loknete Ajitdada Pawar

आज कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर मुख्य ऑफिस येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रीरामपूर बाजार समितीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती मा. सुधीर वेणुनाथ पा.नवले बाजार समितीचे संचालक श्री.सचिन दादा गुजर, श्री.राजेंद्र पाऊलबुद्धे, श्री. मयूर पटारे, श्री. राजू चक्रनारायण श्री.विलास दाभाडे बाजार समितीचे माजी संचालक श्री. किशोर कालंगडे बाजार समितीचे सचिव श्री. साहेबराव वाबळे बाजार समितीचे सर्व व्यापारी वर्ग हमाल, मापाडी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे श्रीरामपूर बाजार समितीला औपचारिक निमंत्रण

  • Formal invitation to Srirampur Market Committee for National Institute of Post-Harvest Technology training program

दिनांक 17/12/2025 रोजी पणन मंडळ पुणे यांच्या कार्यालयातील अधिकारी श्री. सुधीर वाघ साहेब व श्री. नितीन शेवाळे साहेब हे दिनांक 29 डिसेंबर 2025 ते 02 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे, पुणे येथे होणाऱ्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांचे प्रशिक्षणाचे आमंत्रण देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर येथे भेट दिली. यावेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. साहेबराव वाबळे साहेब यांनी त्यांचे आभार मानले .

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाशिक विभागाचे सर व्यवस्थापक श्री. शिवपुरी यांचे आगमन व सत्कार!

  • Arrival and felicitation of Mr. Shivpuri, General Manager of Nashik Division, at Shrirampur Agricultural Produce Market Committee!

दिनांक13/01/2026 रोजी पणन मंडळ नाशिक विभागाचे सर व्यवस्थापक श्री. शिवपुरी पुरी साहेब यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर येथे सदिच्छा भेट दिली, यावेळी बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार बाजार समितीचे सचिव श्री.साहेबराव वाबळे यांच्या हस्ते करण्यात आला.