आस्थापना
- प्रत्येक वर्षी कर्मचा-यांचे कामाचे मुल्यांकन करूण सि.आर. फार्म लिहीने.
- आवश्यकते नुसार सेवक उपसमितीची सभा घेवुन कर्मचा-यांचे कामकाजा बाबत चर्चा करणे. व त्यांचे सि. आर. फार्म सभेत ठेवणे.
- सेवक उपसमिती सभावृत्त लिहिणे व ते कार्यकारी मंडळाचे सभेत मंजुर करूण त्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करणे.
- स्थाई व अस्थाई्र कर्मचा-यांचे नेमणूकी संबंधी सेवानियम, खात्याचे आदेष, परिपत्रकानुसार कार्यवाही करणे, कर्मचा-यांच्या रजा आकारणे, किरकोळ रजेची नोंद ठेवणे, कर्मचा-यांच्या वैयक्तीक फाईल ठेवणे; रजा मंजुरीकरीता नोटसिट चालविणे, रजा मंजुरी आदेश काढणे, देय झालेली वेतनवाढ मंजुरी बाबत कार्यवाही करणे, व त्या संबंधाने आदेश काढणे; रजेची नोंद तथा कर्मचा-यांच्या कार्यकाळातील घटनांच्या /बदलांच्या क्रमवार नोंदी सेवापुस्तकात अद्यावत घेणे; स्थाई/अस्थाई/हंगामी कर्मचारी, नियुक्ती/पदोन्नती संबंधीचे पुर्वपरवानगीचे प्रस्ताव,तसेचआवक्तेनुसार कर्मचा-यांचे वेतननिश्चितीचे प्रस्ताव, खात्याचे प्राधिकृत अधिका-याकडे मंजुरी करीता पाठविणे व त्यासंबंधीचा पाठपुरावा करणे;
- खात्याचे आदेश/परिपत्रकानुसार सेवा नियम दुरूस्ती प्रकरणे मंजुरीकरीता पाठविणे.
- अद्यावत सेवानियमावली ठेवणे; कर्मचा-यांसंबधीचे वा आस्थापना संबंधीचे शासनाचे पणन विभाग/सहकार विभाग /इतर विभागाकडून प्राप्त झालेले आदेश/परिपत्रके संकलित करून ठेवणे.
- कार्यालयीन कामकाजाचे आदेश काढणे; कर्मचारी बदली आदेश काढणे; कर्मचा-यांचे कामकाजा संबंधाने सचिवाचे सुचनेनुसार कर्मचा-यांची सभा बोलाविणे; कर्मचा-यांचे सेवा निवृत्ती वेतना संबंधीची माहिती, संबंधीत कार्यालयाला पाठविणे
- सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-याचे सेवा निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव तयार करून मंजुरीकरिता पाठविणे व त्या संबंधी आवश्यक तो पाठपुरावा करणे
- स्थाई /अस्थाई कर्मचा-यांची हजेरी ठेवणे व त्याप्रमाणे अस्थाई कर्मचा-यांची मजुरी बिले तयार करून मंजुरी घेणे (मुख्यालय व सर्व उपबाजार सहीत)
- रोस्टर बिंदुनामावली अद्यावत करूण घेणे.